E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल
Wrutuja pandharpure
06 May 2025
फलंदाज उर्विल पटेल याचा समावेश
चेन्नई
: आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. ११ सामन्यांत ९ पराभवांसह संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. यासह संघ यंदाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. पण आता संघाते फक्त ३ सामने शिल्लक आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा एक युवा खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूच्या बदलीची घोषणाही केली आहे. सीएसके संघाने अशा खेळाडूचा संघात समावेश केला आहे, ज्याने २८ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
वंश बेदीला यंदाच्या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांमधूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्जने गुजरातकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज उर्विल पटेलला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. उर्विलने २०२४-२५ च्या भारतातील देशांतर्गत टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
उर्विल पटेलने २०२४-२५ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इंदूरमध्ये त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूत शतक झळकावले आणि टी-२० मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. पण त्याआधी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात उर्विल पटेल अनसोल्ड राहिला होता. तो भारतासाठी लिस्ट ए मध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू देखील आहे. २०२३ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते.
उर्विल पटेलने आतापर्यंत ४७ टी-२० सामन्यांमध्ये २६च्या सरासरीने ११६२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ अर्धशतकं आणि २ शतकांचा समावेश आहे. त्याने १७०.३८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. उर्विल पटेल सीएसकेने हंगामाच्या मध्यात झालेल्या चाचण्यांमध्ये भाग घेतलेल्या तीन खेळाडूंपैकी एक होता. या चाचण्या २७ आणि २८ एप्रिल रोजी चेन्नई येथे झाल्या होत्या. यापूर्वी, आयुष म्हात्रे आणि उर्विल पटेल यांना एकत्रितपणे ट्रायलसाठी बोलावण्यात आले होते. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी उर्विलला वगळून आयुषची निवड करण्यात आली.चेन्नई सुपर किंग्जचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज वंश बेदी दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे.
Related
Articles
जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला
30 May 2025
“पाकिस्तानची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान”
28 May 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात